माजी खेळाडूंकडून कोच फ्लेचर टार्गेट, धोनीवर प्रश्नचिन्ह

Updated: Aug 18, 2014, 07:41 PM IST
माजी खेळाडूंकडून कोच फ्लेचर टार्गेट, धोनीवर प्रश्नचिन्ह title=

मुंबईः इंग्लड विरुद्ध ओव्हलमध्ये पाचव्या आणि अंतिम टेस्टमध्ये भारताचा डाव आणि २४४ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर माजी खेळाडूंनी कोच डंकन फ्लेचरला हटविण्याची मागणी केली आहे. तसेच कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या मानहानीकारक पराभवानंतर फ्लेचरच्या भूमिकेवर टीका करताना त्यांचे योगदान शून्य होते त्यांना हटविण्याची वेळ आल्याचेही म्हटले आहे. 

माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी सांगितले की, लॉर्ड्सच्या अवघड पिचवर आपण जिंकल्यावर फ्लेचर काय करत होते. या ठिकाणी रचनात्मक कमजोरी दिसून येते. मला वाटते की फ्लेचरला काढले पाहिजे. इंग्लडमध्ये भारताची खराब कामगिरीचा अंदाज याने लागतो की ओव्हलमध्ये पाचव्या आणि अंतिम मॅचमध्ये ४० वर्षांपूर्वीचा मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आणि मॅच तीन दिवसात संपली आणि इंग्लडने सिरीज ३-१ ने जिंकली. 

धोनीबाबत वाडेकर म्हणाले, त्याने आपल्या तंत्रात बदल केला आणि चांगली फलंदाजी केली. पण मला समजत नाही कर्णधार म्हणून तो आपल्या रणनितीमध्ये बदल का करत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर त्याने थर्ड मॅन नाही ठेवला. ज्या ठिकाणी अर्धे रन झाले. तसेच टीम निवडीतही रविचंद्रन अश्विनला पहिल्या टेस्टपासून खेळवायला पाहिजे होते. मला माहिती नाही असे का केले नाही. 

माजी महान फलंदाज गुंडप्पा विश्वनाथ म्हणतात, कठीण समयी धोनीला आशा वाटते की काही चमत्कार होईल आणि टीम चांगले प्रदर्शन करेल. मी त्याच्या विकेटकिंपिंग आणि कप्तानीवर नाखुश आहे. त्याचे स्वतःचे डोके आहे. तो नेहमी एकच गोष्ट रिपीट करतो आणि चमत्काराची अपेक्षा करतो. चमत्कार नेहमी होत नाही. 

माजी स्पिनर इरापल्ली प्रसन्ना म्हणाले, टीममध्ये फ्लेचरचे योगदान शून्य आहे. माजी कर्णधार श्रीकांत प्रसन्नाच्या म्हणण्याला दुजोरा दिला. माजी क्रिकेटर चंदू बोर्डे म्हणाले. मी हैराण आहे, तरूण खेळाडूंनी आपल्या तंत्रात बदल केला नाही. इंग्लडचा कर्णधार कूकने लॉर्ड्सच्या पराभवानंतर भुवनेश्वरच्या स्वींगपासून वाचण्यासाठी क्रिजच्या बाहेर उभे राहण्याचा निर्णय घेतला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.