पहिल्याच शॉटवर सात रन्स आणि बनला नवा रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिकाविरोधात खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये वेस्ट इंडिजच्या ओपनर क्रेग ब्रॅथवेटनं आपल्या पहिल्याच स्कोअरिंग शॉटवर इतिहास रचलाय. क्रेग टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात पहिला असा खेळाडू बनलाय ज्यानं आपल्या रन्सची सुरुवात सात रन्सनी केलीय. 

Updated: Jan 5, 2015, 10:21 PM IST
पहिल्याच शॉटवर सात रन्स आणि बनला नवा रेकॉर्ड title=

नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिकाविरोधात खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये वेस्ट इंडिजच्या ओपनर क्रेग ब्रॅथवेटनं आपल्या पहिल्याच स्कोअरिंग शॉटवर इतिहास रचलाय. क्रेग टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात पहिला असा खेळाडू बनलाय ज्यानं आपल्या रन्सची सुरुवात सात रन्सनी केलीय. 

वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या इनिंगच्या चौथ्या ओव्हरमध्ये ब्रॅथवेटनं पहिले तीन रन्स धावून काढले आणि जेव्हा तो तिसरा रन पुर्ण करण्यासाठी धावला तेव्हा विकेटकिपर एबी डिविलिय़र्सनं बॉलिंग साइडवर बॉल फेकला जो विकेटवर न लागता सरळ बाऊंड्री लाइनमधून बाहेर निघाला. याप्रकारे ब्रॅथवेटनं आपल्या पहिल्याच स्कोरिंग शॉटवर सात रन्स बनवून टेस्ट क्रिकेटमध्ये नवा रेकॉर्ड बनवला. 

मागील 15 वर्षांमध्ये आतापर्यंत तीन बॅट्समन आहेत ज्यांनी एका बॉलमध्ये सात रन्स बनवलेत. तिन्ही ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आहेत. यापूर्वी मायकल क्लार्क, अँड्र्यू सायमंड आणि क्रिस रोजर्सनं एका बॉलमध्ये सात रन्स केले. 

या नव्या आणि वेगळ्या रेकॉर्डमुळं ब्रॅथवेट काही आणखी धमाल करू शकला नाही आणि या रेकॉर्ड रन्समध्ये त्यानं अधिकचे नऊ रन्स जोडले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.