मुंबई : क्रिकेट विश्व चषक २०१५साठी १५ सदस्यीय संघात युवराज सिंहसह वीरेंद्र सेहवागच्या नावावरही विचार करण्यात येऊ शकतो.
रणजी ट्रॉफी सामन्यात युवराजने लगातार तीन शतक तर वीरेंद्र सेहवाग याने लगोपाठ दोन शतक लगावून आपली दावेदारी सिद्ध केली आहे. सेहवागने गुजरात विरुद्ध शतक लगावले तर त्याने हरियाणाविरुद्ध स्फोटक फलंदाजी करून नाबाद १४७ धावांची खेळी करत अजूनही क्रिजवर आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या ट्रायसीरिज शिवाय पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्डकपसाठी उद्या जेव्हा टीमची निवड करण्यासाठी बैठक होईल, तेव्हा घरगुती मैदानावर युवराज सिंहच्या शानदार खेळीचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.
युवराजला मागील वर्षी 4 डिसेंबरला भारताच्या 30 संभाव्य खेळाडूंच्या यादीत स्थान मिळालं नव्हतं. मात्र रणजी ट्रॉफीमध्ये हरियाणा, महाराष्ट्र आणि सौराष्ट्रच्या विरुद्ध ट्रिपल सेंच्युरी ठोकून आपली गरज दाखवून दिलीय.
युवराजला 2011 वर्ल्डकपमध्ये मॅन ऑफ द सीरिज निवडण्यात आलं होतं. जो वर्ल्डकप भारतानं जिंकला होता. आतापर्यंत युवीनं 293 वनडे मॅचमध्ये 8000हून अधिक रन्स बनवलेत. खांद्याच्या दुखापतीमुळं रिहॅबिलिटेशनमधून जाणाऱ्या रविंद्र जडेजाच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानं निवडकर्ते जेव्हा टीमची निवड करतील तेव्हा युवराजच्या नावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. गुजरातच्या अक्षर पटेललाही टीममध्ये निवडलं जाणं जवळपास निश्चित मानलं जातंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.