स्टोक्स एका ओव्हरने उद्धवस्त झाला : मॉर्गन

Updated: Apr 4, 2016, 02:37 PM IST
स्टोक्स एका ओव्हरने उद्धवस्त झाला : मॉर्गन title=

कोलकाता : ट्‌वेंटी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातील शेवटच्या ओव्हर टाकणारा,  बेन स्टोक्‍स हा उध्वस्त झाला असावा, असं इंग्लडचा कॅप्टन इऑन मॉर्गन याने म्हटलं आहे. 

वेस्ट इंडिजच्या कार्लोस ब्रॅथवेट याने ४ सिक्सर लगावत विंडीजला विजय मिळवून दिला. याचा धक्का स्टोक्‍सला बसला, त्याची निराशा मैदानावर लपत नव्हती. या पार्श्‍वभूमीवर, स्टोक्‍स याच्या मानसिक अवस्थेबद्दल मॉर्गन याला विचारणा करण्यात आली होती. 

'स्टोक्‍स हा उध्वस्त झाला आहे. त्याला या धक्‍क्‍यातून सावरण्यासाठी काही दिवस नक्‍कीच लागतील. मात्र आम्ही त्याच्याबरोबर आहोत, क्रिकेट हा खरोखरच निर्दयी खेळ आहे. आमच्या हातामधून सामना निसटेल, असे कधी वाटलेच नव्हते. 

प्रेक्षकांच्या पाठिंब्यासह प्रत्येक गोष्ट आमच्या बाजूने घडत होती, परंतु, संघामधील प्रत्येक खेळाडूचा अभिमान आहे', असंही यावेळी मॉर्गनने सांगितलं.