इंग्लडचा वन डेमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम

 पाकिस्तानच्या गोलंदाजीच्या चिंधड्या  उडवत इंग्लडने वन डे क्रिकेटमधील सर्वाधिक ३ बाद ४४४ धावांची विक्रमी खेळी केली आहे. पाकिस्तानसमोर ४४५ धावांचा महाकाय हिमालय उभा केला आहे. 

Updated: Aug 30, 2016, 11:12 PM IST
इंग्लडचा वन डेमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम  title=

टेंट ब्रिज :  पाकिस्तानच्या गोलंदाजीच्या चिंधड्या  उडवत इंग्लडने वन डे क्रिकेटमधील सर्वाधिक ३ बाद ४४४ धावांची विक्रमी खेळी केली आहे. पाकिस्तानसमोर ४४५ धावांचा महाकाय हिमालय उभा केला आहे. 

इंग्लडकडून अॅलेक्स हेल्स याने १२२ चेंडूत ४ षटकार आणि २२ चौकारांसह १७१ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याला जो रूट याने ८६ चेंडूत ८७ धावा आणि जॉश बटलरने ५१ चेंडूत ९० धावा कुटल्या. यात ७ चौकार आणि ७ षटकार लगावले. 

पाकिस्तानकडून वाहब रियाद याला १० षटकात सर्वाधिक ११० धावा कुटल्या. 

श्रीलंकाचा विक्रम तोडला. 

यापूर्वी श्रीलंकेने ४४३ धावांची विक्रमी धावसंख्या केली होती. पण आज हा रेकॉर्ड इंग्लडने मोडून काढला आहे. श्रीलंकेने नेदरलँड विरूद्ध हा विक्रम केला होता.