लंडन : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर मुरली विजय 159 आणि महेंद्र सिंह धोनी 50 धावांवर खेळत आहेत. भारताने पहिल्या दिवसअखेर चार बाद 259 धावा केल्या आहेत.
सलामीवीर मुरली विजयचं धडाकेबाज नाबाद शतक आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या संयमी नाबाद अर्धशतकावर हे शक्य झालं आहे.
मुरली विजयनं 294 चेंडूंमध्ये 20 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 122 धावा केल्या. मुरली विजयचं हे कसोटी कारकीर्दीतलं चौथं आणि गेल्या 10 कसोटींमधलं तिसरं शतक आहे.
मुरली विजयला धोनीशिवाय पुजारा आणि रहाणेची चांगली साथ मिळाली. पुजारा 38 आणि रहाणे 32 धावांवर बाद झाला. शिखर धवन आणि विराट कोहली मात्र चांगली कामगिरी करू शकला नाही. धवन फक्त 12 धावा तर कोहलीला एकच धाव काढून परतावं लागलं.
इंग्लंड विरोधातील या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधार धोनीचा निर्णय मुरली विजयनं योग्य ठरवला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.