धोनी पुन्हा दिसणार कर्णधाराच्या भूमिकेत

महेंद्रसिग धोनीने वनडे आणि टी-२०च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिलेला असला तरी त्याच्या फॅन्सनी निराश होण्याची गरज नाही. 

Updated: Jan 7, 2017, 09:06 AM IST
धोनी पुन्हा दिसणार कर्णधाराच्या भूमिकेत title=

मुंबई : महेंद्रसिग धोनीने वनडे आणि टी-२०च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिलेला असला तरी त्याच्या फॅन्सनी निराश होण्याची गरज नाही. 

कारण धोनी पुन्हा एकदा कर्णधाराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या १० जानेवारीला होणाऱ्या पहिल्या सराव सामन्यात धोनी भारत ए संघाचे नेतृत्व करणार आहे. 

धोनीने वनडे आणि टी-२०च्या कर्णधारपदाचा अचानक राजीनामा देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर विराटकडे वनडे आणि टी-२०च्या कर्णधारपदाची सूत्रे सोपवण्यात आलीत.

मात्र मुंबईत होत असलेल्या १० जानेवारीच्या सराव सामन्यात धोनी भारत ए संघाचा कर्णधार असणार आहे. तर अजिंक्य रहाणे १२ जानेवारीला होणाऱ्या दुसऱ्या सराव सामन्यात कर्णधारपदाची भूमिकेत दिसेल.