'टीम इंडिया'च्या फोटोतून धोनी गायब!

सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असणाऱ्या टीम इंडियाला नुकतंच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट यांच्याकडून नव्या वर्षाच्या निमित्तानं बोलावणं आलं होतं... यावेळी अॅबॉट यांच्यासोबत टीम इंडियाच्या खेळाडूंचं एक अधिकृत फोटोसेशनही पार पडलं... पण, उल्लेखनीय म्हणजे या फोटोमध्ये टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी मात्र कुठेही दिसत नाहीय. 

Updated: Jan 1, 2015, 06:09 PM IST
'टीम इंडिया'च्या फोटोतून धोनी गायब! title=

सिडनी : सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असणाऱ्या टीम इंडियाला नुकतंच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट यांच्याकडून नव्या वर्षाच्या निमित्तानं बोलावणं आलं होतं... यावेळी अॅबॉट यांच्यासोबत टीम इंडियाच्या खेळाडूंचं एक अधिकृत फोटोसेशनही पार पडलं... पण, उल्लेखनीय म्हणजे या फोटोमध्ये टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी मात्र कुठेही दिसत नाहीय. 

नव्या वर्षाच्या निमित्तानं गुरुवारी टोनी अॅबॉट यांच्या राहत्या घरी 'किरीबिली हाऊस'वर सर्व खेळाडूंना एका चहा पार्टीचं आमंत्रण देण्यात आलं होतं... यावेळी, टीम इंडियाचा अॅबॉट यांच्यासोबतचे फोटो बीसीसीआयनं सोशल वेबसाईट ट्विटवर पोस्ट केलेत. या फोटोंमध्ये नुकताच टेस्ट क्रिकेटमधून संन्यास जाहीर केलेला टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी मात्र गायब आहे. धोनी या संपूर्ण कार्यक्रमात उपस्थित होता किंवा नाही, याबद्दल माहिती समजलेली नाही.

धोनीनं मेलबर्न टेस्ट संपताच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. चौथ्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये विराट कोहली टीम इंडियाची धुरा सांभाळणार आहे. तर टी-20 आणि वन डेमध्ये धोनी कॅप्टन म्हणून कायम राहील.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.