आयसीसी रँकिंगमध्ये कोहली १५ व्या स्थानावर

 भारताचा नवा टेस्ट कर्णधार विराट कोहली मेलबर्नमध्ये तिसऱ्या टेस्टच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये चार स्थानांच्या फायद्याने १५ व्या स्थानावर पोहचला आहे. 

Updated: Jan 1, 2015, 03:26 PM IST
आयसीसी रँकिंगमध्ये कोहली १५ व्या स्थानावर  title=

दुबई :  भारताचा नवा टेस्ट कर्णधार विराट कोहली मेलबर्नमध्ये तिसऱ्या टेस्टच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये चार स्थानांच्या फायद्याने १५ व्या स्थानावर पोहचला आहे. 

तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये १६९ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ५४ धावा काढल्या होत्या. त्यामुळे कोहलीने ७३७ रँकिंगसह भारतीय फलंदाजांमध्ये अव्वल स्थान मिळाले आहे. 

चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय क्रमशः १९ आणि २० व्या स्थानासह टॉप २० मध्ये स्थान मिळवले आहे. पुजाराला दोन आणि विजयला एक स्थानाचे नुकसान झाले आहे. 

तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये १४७ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ४८ धावा केल्यानंतर अजिंक्य रहाणेने १५ स्थानांची उडी मारून तो २६ व्या स्थानावर पोहचला आहे. 

दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलिअर्सने पुन्हा एकदा कुमार संघकाराला मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

कसोटी गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये भारताचा उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांना आठ-आठ स्थानांचा फायदा होऊन ते ३६ आणि ३८ व्या स्थानावर पोहचले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन अव्वल स्थानावर आहे. 

आयसीसी टेस्ट ऑलराउंडरच्या यादीत टॉप पाचमध्ये काही बदल झाले नाहीत. साकीब अल हसन अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा वर्नन फलेंडर आणि त्यानंतर रविचंद्रन अश्विनचा क्रमांक येतो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.