बॅटच्या माध्यमातून धोनी शोधतोय वर्ल्डकप जिंकण्याचं गमक

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, धोनी सध्या वनडे 'वर्ल्ड कप'च्या तयारीकडे लक्ष देतोय.  या रिपोर्टनुसार टीम इंडियाला जिंकवण्यासाठी धोनीन एक खास बॅटचा वापर करणार आहे, ज्या बॅटने धोनी उंचच उंच सिक्सर लावण्याचा प्रयत्न करणार आहे. हा वर्ल्डकप ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे.

Updated: Jan 8, 2015, 09:09 PM IST
बॅटच्या माध्यमातून धोनी शोधतोय वर्ल्डकप जिंकण्याचं गमक title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, धोनी सध्या वनडे 'वर्ल्ड कप'च्या तयारीकडे लक्ष देतोय.  या रिपोर्टनुसार टीम इंडियाला जिंकवण्यासाठी धोनीन एक खास बॅटचा वापर करणार आहे, ज्या बॅटने धोनी उंचच उंच सिक्सर लावण्याचा प्रयत्न करणार आहे. हा वर्ल्डकप ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे.

धोनीने ऑर्डर देऊन खास १० बॅट बनवल्या आहेत. या बॅटचं वजन, लांबी, रूंदी आणि आकार या विषयी धोनीने कंपनीसमोर आपलं मत ठेवलं आहे, या नुसार धोनीची बॅट तयार करण्यात येत आहे. धोनीला १० पैकी ३ बॅट देण्यात आल्या आहेत, त्यापैकी ७ बॅट बनवणं सुरू आहे, या सात बॅटही धोनीने सांगितल्याप्रमाणे तयार केल्या जात आहेत.

धोनी आणि त्याच्या फॅन्सचा सर्वात आवडता हेलिकॉप्टर शॉट प्रसिद्ध आहे, याचा विचार करून हा फटका लगावण्यासाठी धोनीला परफेक्ट बॅट हवी आहे.

धोनीच्या बॅटने खेळतो, त्या बॅटचा नंबर ४.९ असतो. या बॅटची लांबी, रूंदी सामान्य बॅटपेक्षा थोडी वेगळी असते, धोनी ज्या बॅटने खेळतो त्या बॅटचं वजन १२७० ग्रँम म्हणजेच सव्वा किलो असतं, धोनी सात नंबरच्या बॅटने खेळतो, धोनी कधी-कधी सात नंबरच्या बॅटने देखिल खेळतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.