ब्रॅन्डन मॅक्क्युलमने सोडली चेन्नई सुपरकिंग्सची साथ!

आयपीएलमध्ये धडाकेबाज फलंदाजी करणारा चेन्नई सुपरकिंग्सचा ब्रॅन्डन मॅक्क्युलम इंग्लंडला रवाना झाला आहे. न्यूझीलंडचा संघ त्याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 9, 2015, 02:25 PM IST
ब्रॅन्डन मॅक्क्युलमने सोडली चेन्नई सुपरकिंग्सची साथ! title=

चेन्नई: आयपीएलमध्ये धडाकेबाज फलंदाजी करणारा चेन्नई सुपरकिंग्सचा ब्रॅन्डन मॅक्क्युलम इंग्लंडला रवाना झाला आहे. न्यूझीलंडचा संघ त्याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला आहे.

चेन्नईकडून आयपीएल-८मध्ये दहा सामन्यात सर्वाधिक ३१५ रन मॅक्क्युलमने केले आहेत. न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरूद्ध पाचएकदिवसीय, दोन कसोटी आणि एक टी-२० सामना खेळणार आहे. न्यूझीलंडचा हा दौरा मोठा असल्याने प्ले-ऑफमध्येही मॅक्क्युलमला चेन्नईकडून खेळता येणार नाही.

आयसीसीचे दौरे आणि आयपीएल सामन्यांच्या तारखा यांचा वाद सोडवला गेलेला नाही. त्यामुळे खेळाडूंना याचा फटका बसतआहे. रायस्थान संघाचा टीम साउदी, मुंबई इंडियन्सचा कोरी एंडरसन आणि हैदराबादचा ट्रेंट बोल्ट, केन विलियम्सन यासारखे खेळाडू न्यूझीलंडकडून खेळण्यासाठी रवाना झाले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.