नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमचा उपकर्णधार विराट कोहली आता थोडा आणखी स्पेशल बनलाय... कारण, आता विराट कोहली अशांपैकी एक आहे ज्या व्यक्तींकडे ऑडीची आत्तापर्यंतची सर्वात वेगवान सुपरकार आहे.
कंपनीनं 'ऑडी आर ८ एलएमएक्स लिमिटेड एडिशन' नावानं ही कार सादर केलीय. या गाडीची किंमत आहे तब्बल २ करोड ९७ लाख रुपये...
'ऑडी आर ८ एलएमएक्स लिमिटेड एडिशन' या मॉडेलचे केवळ ९९ गाड्या तयार होणार आहेत आणि विकल्या जाणार आहेत.
विराट कोहली ही गाडी खरेदी करणारा पहिला भारतीय ठरलाय. त्यामुळे, या गाडीची चावी ऑडी इंडियाचे प्रमुख जॉय किंग यांनी आपल्या हातांनी विराटकडे सुपूर्द केलीय.
ऑडीच्या या सर्वात वेगवान सुपरकारमध्ये ५.२ लीटर व्ही १० इंजिन लावलंय. तसंच ७ स्पीड एस-ट्रॉनिक गिरअरबॉक्सही आहे. या गाडीत ५७० बीएचपी पॉवर तसंच ५४० एनएम चा टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे.
महत्त्वाचं म्हणजे, ० ते १०० किलोमीटर प्रतितास वेग पकडण्यासाठी या गाडीला केवळ ३.४ सेकंदांचा वेळ लागतो. या गाडीचा टॉप स्पीड ३२० किलोमीटर प्रतीतास आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.