फिल ह्युजला अखेरचा निरोप, क्लार्कनं दिला खांदा

क्रिकेट खेळताना डोक्याला बॉल लागून मृत्यू झालेला ऑसी क्रिकेटपटू फिल ह्युजेसवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. मॅक्सव्हिल या त्याच्या जन्मगावी ह्युजेसवर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Updated: Dec 3, 2014, 12:18 PM IST
फिल ह्युजला अखेरचा निरोप, क्लार्कनं दिला खांदा title=

मॅक्सव्हिल: फिलीप ह्युज यांच्यावर आज त्याच्या गावी मॅक्सव्हिल इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार कार्यक्रमाला यावेळी कॅप्टन मायकल क्लार्कसह संपूर्ण टेस्ट टीम स्क्वॉड हजर होती. केवळ एवढंच नव्हे तर अनेक आजी माजी ऑसी क्रिकेटर्सनेही हजेरी लावली होती.

फिलच्या अंत्यसंस्काराला त्याचे नातेवाईक आणि जवळचे मित्र असे जवळपास अडीच हजार लोकं उपस्थित होते. फिलच्या अंत्यसंस्कारावेळी पॉलबेअरर असलेल्या मायकल क्लार्कनं फिलच्या आठवणींना उजाळा दिला तेव्हा तर हॉलमधील उपस्थितांना अश्रू आवरणंही कठीण झालं होतं.

आकर्षक पांढऱ्या फुलांनी सजवलेल्या चॉकलेटी रंगाच्या कॉफिनमध्ये चिरनिद्रा घेणाऱ्या फिल ह्युजेसच्या शेजारी त्याची आवडती बॅट, तसंच बॅगी ग्रीन कॅप, त्याच्या डोमेस्टीक टीमची कॅप आणि त्याचा ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा गणवेषही ठेवण्यात आला होता. या अंत्यसंस्काराला ऑस्ट्रेलियन पंतप्रधान टोनी अबॉटही हजर होते. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली, रोहित शर्मा, आणि रवी शास्त्री यांनीही फिलला आदरांजली वाहिली. 

फिलच्या अंत्यसंस्काराचं जगभरात थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं.

RT @DerekP2ue: Macksville High School auditorium, where the funeral for Phillip Hughes will be held this afternoon. pic.twitter.com/GGYvG8ALNa

— News Talk 2UE 954 (@NewsTalk2UE) December 3, 2014

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.