अॅडलेड टेस्टपूर्वी भारतीय संघात धोनी होणार सामील

 भारतीय कर्णधार महेंद्र सिंह धोनी नऊ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या टेस्टपूर्वी भारतीय संघात सामील होणार आहे. हाताला जखम झाल्यामुळे धोनीला पहिल्या टेस्टच्या सुरूवातीच्या टीममध्ये जागा देण्यात आली नव्हती. ही टेस्ट ४ डिसेंबरपासून ब्रिसबन येथे होणार होती. १२ डिसेंबरपासून अॅडलेड  येथे होणाऱ्या दुसऱ्या टेस्टपूर्वी संघात धोनी सामील होणार होता. 

Updated: Dec 2, 2014, 01:41 PM IST
अॅडलेड  टेस्टपूर्वी भारतीय संघात धोनी होणार सामील title=

अॅडलेड  :  भारतीय कर्णधार महेंद्र सिंह धोनी नऊ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या टेस्टपूर्वी भारतीय संघात सामील होणार आहे. हाताला जखम झाल्यामुळे धोनीला पहिल्या टेस्टच्या सुरूवातीच्या टीममध्ये जागा देण्यात आली नव्हती. ही टेस्ट ४ डिसेंबरपासून ब्रिसबन येथे होणार होती. १२ डिसेंबरपासून अॅडलेड  येथे होणाऱ्या दुसऱ्या टेस्टपूर्वी संघात धोनी सामील होणार होता. 
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर फिलिप ह्युजेस याचे निधन झाल्याने चार सामन्यांच्या मालिकेच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला. त्यामुळे भारतीय कर्णधार आता टेस्ट मालिकेपूर्वी भारतीय संघात सामील होणार आहे. 

क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून काल रात्री उशीरा घोषित करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आता अॅडलेडला ९ डिसेंबरपासून १२ डिसेंबरपर्यंत होणार आहे. दुसरा सामना गाबावरून १७ ते २१ डिसेंबर दरम्यान होणार आहे.
 
तिसरा बॉक्सिंग डे टेस्टच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला नाही. हा सामना पहिल्या नियोजनानुसार २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. मालिकेतील चौथा आणि अंतीम सामना सिडनीमध्ये होणार आहे. हा सामना तीन जानेवारी ते ६ जानेवारी दरम्यान होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.