वर्ल्ड कप : भारत-द.आफ्रिका लढतीबद्दल जॉन्टीची भविष्यवाणी

भारताने वर्ल्ड कप अभियानाची सुरूवात पाकिस्तानला नमवून केली असली तरी रविवारी होणाऱ्या सामन्यात द. आफ्रिका भारताला पराभूत करेल असे भाकीत द. आफ्रिकेचा क्षेत्ररक्षक जॉन्टी रोड्सने व्यक्त केले आहे. 

Updated: Feb 20, 2015, 04:41 PM IST
वर्ल्ड कप : भारत-द.आफ्रिका लढतीबद्दल जॉन्टीची भविष्यवाणी title=

नवी दिल्ली : भारताने वर्ल्ड कप अभियानाची सुरूवात पाकिस्तानला नमवून केली असली तरी रविवारी होणाऱ्या सामन्यात द. आफ्रिका भारताला पराभूत करेल असे भाकीत द. आफ्रिकेचा क्षेत्ररक्षक जॉन्टी रोड्सने व्यक्त केले आहे. 

जॉन्टीने म्हटले की, पाकिस्तान विरूद्ध भारताने विजयश्री मिळविला असला तरी द. आफ्रिकेची फलंदाजी मजबूत आहे. गोलंदाजी धारदार आहे आणि फिल्डिंग जबरदस्त आहे, त्यामुळे त्यांचे पारडे जड आहे. 

वर्ल्ड कपसाठी विश्लेषक म्हणून याहू क्रिकेटशी संलग्न असलेल्या जॉन्टीने म्हटले आहे, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षणासह त्यांचा धडाकेबाज कर्णधार ही जमेची बाजू आहे. डेल स्टेन, मोर्नी मॉर्कल, वेर्नोन फिलँडर आणि वेन पारनेल या सारख्या मजबूत दक्षिण आफ्रिकन आक्रमणासमोर भारताचा टिकाव लागणे मुश्कील आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.