टी-२० मधील ९ वाद घ्या जाणून

भारतात टी-२० वर्ल्डकपचे रणशिंग फुंकले गेले आहे. आज सुपर १० मधील पहिला सामना होतोय. २००७मध्ये टी-२० पहिली वर्ल्डकप स्पर्धा झाली होती. या स्पर्धेशी संबंधित हे ९ वाद

Updated: Mar 15, 2016, 11:50 AM IST
टी-२० मधील ९ वाद घ्या जाणून title=

नवी दिल्ली : भारतात टी-२० वर्ल्डकपचे रणशिंग फुंकले गेले आहे. आज सुपर १० मधील पहिला सामना होतोय. २००७मध्ये टी-२० पहिली वर्ल्डकप स्पर्धा झाली होती. या स्पर्धेशी संबंधित हे ९ वाद

१. २००७मधील पहिल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताची चौकडी सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण खेळले नव्हते. मात्र हे रहस्य अद्याप रहस्यच राहिलंय. 

२. २००७मधील पहिल्या वर्ल्डकपदरम्यान वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतच्या नावावर आणखी एक वाद जोडला गेला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रीसंतने १२ धावांत दोन बळी घेतले होते. मात्र विनाकारण अपील केल्यामुळे त्याच्या मॅचफीमधून २५ टक्के रक्कम कापण्यात आली. 

३. २००९च्या वर्ल्डकपमध्ये भारत सेमीफायनलपर्यंतही पोहोचू शकला नव्हता. या सामन्यात इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात विजयासाठी १५४ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ १५० धावाच बनवू शकली होती. या सामन्यात धोनीने रविंद्र जडेजाला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवल्याने वाद झाला होता. 

४. २००९च्या वर्ल्डकपदरम्यान ऑस्ट्रेलियाचा अँड्र्यू सायमंडस याला नियम तोडल्याप्रकरणी स्पर्धेदरम्यान बाहेर काढण्यात आले. २००५मध्ये इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस सीरिजदरम्यानही सायमंड दारुच्या नशेत आढळला होता तेव्हाही त्याला घरी पाठवण्यात आले होते. 

५. २०१०च्या वर्ल्डकपमधील साखळी फेरीत श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना डकवर्थ लुईसमुळे चांगलाच रंगला. श्रीलंकेने १७३ धावा बनवल्या. त्यानंतर पाऊस सुरु झाला. ज्यामुळे झिम्बाब्वेला विजयासाठी ११ ओव्हरमध्ये १०६ धावांचे आव्हान देण्यात आले. त्यानंतर ५ ओव्हरमध्ये ४४ धावा बनवण्याचे आव्हान देण्यात आले मात्र झिम्बाब्वेला केवळ २९ धावा करता आल्या. 

६. २०१०च्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने पहिल्यांदा कोणत्याही फॉरमॅटमधील पहिला वर्ल्डकप जिंकला होता. या विजयाचा हिरो होता केविन पीटरसन. 

७. २०१२ मध्ये पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंचा वर्ल्डकप एकत्र खेळवण्यात आला. यावेळी पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना दिल्या जाणाऱ्या मानधनावरुन वाद निर्माण झाला होता.  

८. २०१४च्या वर्ल्डकपमध्ये भारताचा ऑलराउंडर युवराज सिंगला त्याच्या खेळीने व्हिलन बनवले. श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात युवराजने २१ चेंडूत ११ धावा केल्या. त्याच्या संथ खेळीमुळे भारताच्या हातून विजय निसटला. यावेळी चोहोबाजूंनी युवराजवर टीका करण्यात आली. त्यानंतर त्याला संघात स्थानही देण्यात आले नव्हते.  

९. आयपीएलदरम्यान स्पायडरकॅमच्या वापरावर धोनीने आक्षेप नोंदवला होता. इतकंच नव्हे तर नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही त्याने स्पायडरकॅमबाबत विरोध दर्शविला होता. मात्र आयसीसी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की यंदाच्या वर्ल्डकपमध्ये स्पायडरकॅमचा वापर होईल.