टीम इंडियाकडून पाकिस्तानचा सलग ११ वा पराभव

टीम इंडियाने पाकिस्तानला प्रथमच ईडन गार्डन मैदानावर धूळ चारली. मात्र, पाकिस्तानचा हा भारताबरोबरचा सलग ११ वा पराभव आहे. टी-२०मध्ये सलग ६ वा पराभव आहे.

Updated: Mar 19, 2016, 11:56 PM IST
टीम इंडियाकडून पाकिस्तानचा सलग ११ वा पराभव title=

कोलकाता : टीम इंडियाने पाकिस्तानला प्रथमच ईडन गार्डन मैदानावर धूळ चारली. मात्र, पाकिस्तानचा हा भारताबरोबरचा सलग ११ वा पराभव आहे. टी-२०मध्ये सलग ६ वा पराभव आहे.

टीम इंडिया पाकिस्तानबरोबर ईडन गार्डन मैदानावर खेळताना आतापर्यंत एकही विजय मिळवला नव्हता. ही मालिका भारताने खंडीत केलेय. विराट कोहलीने शानदार खेळी करत टीम इंडियाला मोठा विजय मिळवून दिलाय. त्यामुळे टी -२० वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला सलग ६ वेळी हरविण्याची किमया केली आहे.

१९९२ पासून पाच वर्ल्ड कप ५०-५०चे झालेत. यावेळी पाच वेळा हरविले तर. २००७ मधील पहिल्या टी-२० टी-२० वर्ल्डकप मध्ये दोन मॅच जिंकल्या. पाकिस्तानला चारीमुंड्या चीत करण्याचा भीम पराक्रम टीम इंडियाने केलाय.