तिसऱ्या टेस्टमध्ये पराभव, ट्विटरवर विराट-अनुष्काची खेचली

इंग्लडविरोधात तिसऱ्या कसोटी सामन्या टीम इंडियाचा दारूण पराभव झाला. या पराभवाला क्रिकेट फॅन्सने क्रिकेटरांपेक्षा बॉलिवुड अभिनेत्री अनुष्का शर्माला जास्त जबाबदार धरले आहे. टीम इंडियाचा २६६ धावांननी पराभव झाला आणि ट्विटरवर अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीवर अनेक जोक्स शेअर झाले. 

Updated: Aug 1, 2014, 07:49 PM IST
तिसऱ्या टेस्टमध्ये पराभव, ट्विटरवर विराट-अनुष्काची खेचली title=

साऊथहॅम्पट : इंग्लडविरोधात तिसऱ्या कसोटी सामन्या टीम इंडियाचा दारूण पराभव झाला. या पराभवाला क्रिकेट फॅन्सने क्रिकेटरांपेक्षा बॉलिवुड अभिनेत्री अनुष्का शर्माला जास्त जबाबदार धरले आहे. टीम इंडियाचा २६६ धावांननी पराभव झाला आणि ट्विटरवर अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीवर अनेक जोक्स शेअर झाले. 

काही दिवसांपूर्वी अशा बातम्या आल्या की अनुष्का शर्मा इंग्लड दौऱ्यावर विराट कोहली सोबत होती. या संपूर्ण सिरीजमध्ये विराटची बॅट तळपली नाही. त्यामुळे लोक अनुष्काच्या उपस्थितीला जबाबदार धरत आहेत. 

 

काही अशा प्रकारे विराट-अनुष्कावर जोक करण्यात आले – 

Sir Ravindra Jadeja @SirJadeja 
टीम इंडियाची पुढील सामन्यासाठी टीम जाहीर – समावेश – गंभीर, अश्विन, अरॉन 
डच्चू – धवन, शामी, रोहित शर्मा.... आणि अनुष्का शर्मा 
Team for Next match announced- IN: Gambhir, Ashwin, Aaron. OUT: Dhawan, Shami, Rohit Sharma.. and Anushka Sharma. #ENGvIND #IndVsEng
.................
Broken Cricket @BrokenCricket

भारत तीन शर्मांमुळे अडचणीत आला आहे – १) इशांत शर्मा (जखमी) २) अनुष्का शर्माची लंडनमधील उपस्थिती ३) रोहित शर्माची बॅटिंग 

India Suffering from three Sharma: 1.Ishant Sharma injury 2.Anushka Sharma presence in London 3.Rohit Sharma batting 

.................

Broken Cricket @BrokenCricket

बीसीसीआयने पुढील सामन्यात दोन बदल करावे : 1) धवनला डच्चू द्यावा आणि गंभीरचा समावेश करावा २) अनुष्काला भारतात पाठवा. 

BCCI should make two Changes for Next Test: 1.Drop Dhawan & Select Gambhir 2.Send Anushka Sharma back to India 

.................
SubraMinion @Try2StopME
विराट कोहलीने बॅटिंग फॉर्म घालविल्याबद्ल अनुष्का शर्माकडून ४०० कोटी मागणी करावी 
Virat Kohli must demand ₹400 crores from Anushka Sharma for screwing his batting form.

.................

Akhilesh Mishra @maverickilroy
अनुष्का शर्मा ही दुसरी दीपिका पदुकोण आहे का? नेशन्स वॉन्ड टू नो. विराट कोहली खराब फॉर्म सुरूच...
Is Anushka Sharma the next Deepika Padukone?? #TheNationWantsToKnow. Poor form of Virat Kohli continues

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.