मीरपूर : टीम इंडियाच्या खेळाडूंवर लक्ष देणारे अनेक व्यक्ती आहेत, आता भारतीय संघाच्या कोचचे पद अजूनही काही काळ रिक्त ठेवले तरी काही चिंता नाही, असे मत टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्र सिंग धोनीने व्यक्त केले आहे. तडकाफडकीने या पदावर व्यक्तीचे नियुक्ती करू नये असेही धोनी म्हटले आहे.
वर्ल्ड कप नंतर डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर कोच पदासाठी अनेक व्यक्तींच्या नावाचा चर्चा केली जात होती. भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यात डंकंन फ्लेचरची महत्वाची भूमिका होती.
बांगलादेश मालिका गमावल्यावर पत्रकारांनी विचारले की भारत कोच नसल्यामुळे पराभूत झाला का ? यावर धोनी म्हणाला, म्हणजे पत्रकारांना डंकनची कमतरता भासते आहे. मला वाटते की डंकन हा एकमेव व्यक्ती होती ती मीडियाला आव़डत नव्हती. त्यांनी टीमसाठी खूप मेहनत घेतली. ते टीम सोबत अनेक वर्ष होते. त्यांना अनेक कठीण दौऱ्याचा सामना करावा लागला.
वन डे मालिका गमावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना धोनीने संकेत दिले की, आता सपोर्टिंग स्टाफ भारतीय खेळाडूंची चांगली काळजी घेत आहेत. त्यामुळे पुढील काही काळासाठी कोच नसला तरी चालेल. पण कोच हवा आहे म्हणून तडकाफडकी कोणाचीही नियुक्ती केल्यास त्याचा टीमवर वाईट परिणाम होईल. तसेच भविष्यात टीमच्या भल्यासाठी काही काळ यावर अधिक विचार व्हावा आणि निर्णय घ्यावा, असेही मत धोनीने व्यक्ते केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.