नवी दिल्ली: बांग्लादेशविरुद्ध दुसऱ्या वनडे मॅच दरम्यान विराट कोहलीची जादू चालली नाही. कोहलीकडून या मॅचमध्ये खूप अपेक्षा होत्या पण, विराट पुन्हा फ्लॉप ठरला.
मात्र या मॅचमधील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे विराट कोहलीनं फ्री हिटच्या बॉलवर डिफेंसिव्ह शॉट मारला. कोहलीनं २३ रन्स बनवले. जेव्हा भारत ३.५ ओव्हरमध्ये एक विकेट गमावून २१ रन्सवर खेळत होता. तेव्हा तश्किन अहमदच्या बॉलवर नो बॉल होता आणि त्यामुळं फ्री हिट मिळाली. पण त्या बॉलचा फायद न घेता कोहलीनं बचावात्मक शॉट मारला.
विराटनं चांगला शॉट मारला असता अन तो रन आऊट झाला असता तरीही फ्री हिट असल्यामुळं तो आऊट झाला नसता. मग अशात त्यानं डिफेंसिव्ह शॉट का खेळला? असा प्रश्न मॅच पाहणाऱ्या क्रिकेट फॅन्ससमोर उभा राहिलाय.
(व्हिडिओ सौजन्य - Willow TV Youtube account)
पाहा व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.