ब्रेट लीचा क्रिकेटमधूनच निवृत्त होण्याचा निर्णय

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर ब्रेट लीनं टी-२० क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केलीय. या वर्षांच्या शेवटी बीबीएलनंतर ब्रेट ली कधीच टी-२० क्रिकेटमध्ये खेळताना नाही.

Updated: Jan 15, 2015, 03:36 PM IST
ब्रेट लीचा क्रिकेटमधूनच निवृत्त होण्याचा निर्णय title=

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर ब्रेट लीनं टी-२० क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केलीय. या वर्षांच्या शेवटी बीबीएलनंतर ब्रेट ली कधीच टी-२० क्रिकेटमध्ये खेळताना नाही.

यापूर्वी, २०१२ मध्ये ब्रेट लीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. त्यानंतर लीनं आयपीएल आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या एचआरव्ही कपमध्ये सहभाग घेतला होता. २०१३ मध्ये तो 'कोलकाता नाईट रायडर्स' टीमसोबत खेळला होता. 

या निवृत्तीनंतर ब्रेट ली क्रिकेटच्या कोणत्याही फॉर्मेटमध्ये दिसू शकणार नाहीय.... 'मी सिझनची सुरुवात करण्यापूर्वीपासूनच जाणत होतो की हा माझा शेवटचा सीझन असेल... मी कोट ट्रेवर बेलिस यांची भेट घेतली आणि याबद्दल चर्चा केली की मी आणखी दोन-तीन वर्ष क्रिकेट खेळू शकेल... माझ्याकडे हा ऑप्शन होता पण मी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला' असं त्यानं म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.