अनुष्काची सुटली 'साथ'... विराटच्या खेळाची लागणार 'वाट'?

ऑस्ट्रेलियात नुकत्याच संपलेल्या टेस्ट सीरिजमध्ये विराट कोहलीच्या खेळाचं अनेकांनी चांगलंच कौतुक केलंय... या टेस्ट सीरिज दरम्यान अनुष्का शर्माही त्याच्यासोबत उपस्थित होती. आता, लवकरच सुरु होणाऱ्या वन डे सीरिजमध्ये मात्र विराटनं फोर आणि सिक्स ठोकल्यानंतर त्याच्यावर आनंदानं कौतुकाची उधळण करायला अनुष्का मात्र उपस्थित राहू शकणार नाही.

Updated: Jan 15, 2015, 03:23 PM IST
अनुष्काची सुटली 'साथ'... विराटच्या खेळाची लागणार 'वाट'? title=

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात नुकत्याच संपलेल्या टेस्ट सीरिजमध्ये विराट कोहलीच्या खेळाचं अनेकांनी चांगलंच कौतुक केलंय... या टेस्ट सीरिज दरम्यान अनुष्का शर्माही त्याच्यासोबत उपस्थित होती. आता, लवकरच सुरु होणाऱ्या वन डे सीरिजमध्ये मात्र विराटनं फोर आणि सिक्स ठोकल्यानंतर त्याच्यावर आनंदानं कौतुकाची उधळण करायला अनुष्का मात्र उपस्थित राहू शकणार नाही.

विराटच्या यशात त्याच्या 'लेडी लक'चंही योगदान आहे, असं त्याच्या फॅन्सना वाटतंय. वन डे पासून ते टेस्टपर्यंत आणि हैदराबादपासून ते सिडनीपर्यंत प्रत्येक मॅचच्या वेळी विराटनं ५० - १०० ठोकल्यानंतर अनुष्काचं स्टँडिंग ओवेशन पाहायची आता तर त्यालाही सवय झाली असेल... हीच सवय त्याला वन डेमध्ये भारी पडण्याची शक्यता आहे. 

टेस्ट संपल्यानंतर आता ऑस्ट्रेलियामध्ये कोहली रंगीत कपड्यांत मैदानांत उतरणार आहे. पण, विराटला अनुष्काची साथ मात्र टेस्ट सीरिजपर्यंतच होती... कारण, 'बीसीसीसीआय'नं दिलेल्या या गिफ्टची व्हॅलिडीटी आता संपतेय. महत्त्वाचं म्हणजे, बोर्डाच्या नियमांत बदल करून ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिजदरम्यान गर्लफ्रेंडला सोबत नेण्यासाठी विराटला परवानगी दिली होती. 

जर विराटनं आपलं या प्रेमाची व्हॅलिडीटी आयुष्यभरासाठी भरून घेतली तर बीसीसीआयला अशा पद्धतीनं पार्ट टाईम रिचार्ज करण्याची गरज उरणार नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.