नवी दिल्ली : टीम इंडियाचा चर्चित ऑफ स्पिनर हरभजन सिंग लग्नाच्या बेडीत अडकतोय. तोही याच महिण्यात. भज्जी आपली गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड तारका गीता बसरा हिच्यासोबत विवाह करण्याचे वृत्त आहे.
असे असले तरी हरभजन आणि गीता यांनी आपल्या रिलेशनबाबत स्पष्ट माहिती दिलेली नाही. मात्र, एका रिपोर्ट्सच्या माहितीवरुन हे दोघे या महिन्यात लग्न करणार आहेत.
गीता बसरा अनेकवेळा हजभजनसोबत दिसली आहे. तसेच आयपीएल स्पर्धेच्यावेळी ती मुंबी इंडियन्स संघाला पाठिंबा देताना दिसली आहे. हजभजन हा मुंबईकडून खेळतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.