सिडनी : बॉल लागून मृत्यूमुखी पडलेला क्रिकेटपटू फिलीप ह्युजेसला श्रद्धांजली वाहताना ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन माइकल क्लार्कला अक्षरश: अश्रू अनावर झाले.
संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये त्याला रडू रोखणं कठीण गेल आणि रडतच त्यानं ह्युजेसला श्रद्धांजली वाहिली. एक टीम म्हणून आम्ही काय गमावलय हे मी शब्दांमध्ये व्यक्त करु शकत नाही. ह्युजेसचं खळखळून हसणं आणि डोळ्यांमधील चमक आम्ही नेहमीच मिस करु. आमच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण आता पूर्वीसारखी कधीच होणार नाही. आम्ही त्याच्यावर प्रेम करत असे आणि नेहमीच करत राहू त्याच्या आत्म्याला शांती मिळो, अशी श्रद्धांजली क्लार्कने वाहिली.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची पहिली टेस्ट 4 डिसेंबरला सुरु होणार नसल्याची घोषणा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली आहे. ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन फिल ह्युजेस याच्यावर 3 डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार होणार असून दुस-या दिवशी ऑस्ट्रेलियान क्रिकेटपटू खेळण्याच्या मानसिक स्थितीत नसल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान पहिली टेस्ट कधी सुरु होणार हे अद्यापपर्यंत जाहीर करण्यात आलेल नाही. पहिली टेस्ट ही ब्रिस्बेन इथं खेळवली जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान चार टेस्टची सीरिज आयोजित करण्यात आलेली आहे. ह्युजेसला बॉल लागून त्याचा मृत्यू झाल्याने सा-या क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.