ह्युजेसवर ३ डिसेंबरला अंत्यसंस्कार, पहिली टेस्ट पुढे ढकलली

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची पहिली टेस्ट ४ डिसेंबरला सुरु होणार नसल्याची घोषणा क्रिकेट ऑस्ट्रेलियानं केली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन फिल ह्युजेस याच्यावर ३ डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. 

Updated: Nov 29, 2014, 02:23 PM IST
ह्युजेसवर ३ डिसेंबरला अंत्यसंस्कार, पहिली टेस्ट पुढे ढकलली title=

मुंबई: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची पहिली टेस्ट ४ डिसेंबरला सुरु होणार नसल्याची घोषणा क्रिकेट ऑस्ट्रेलियानं केली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन फिल ह्युजेस याच्यावर ३ डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. 

ह्युजेसवरील अंत्यसंस्काराच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू खेळण्याच्या मानसिक स्थितीत नसल्यामुळं क्रिकेट ऑस्ट्रेलियानं हा निर्णय घेतला आहे. दरम्यान पहिली टेस्ट कधी सुरु होणार हे अद्यापपर्यंत जाहीर करण्यात आलेल नाही. 

पहिली टेस्ट ही ब्रिस्बेन इथं खेळवली जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान चार टेस्टची सीरिज आयोजित करण्यात आलेली आहे. ह्युजेसला बॉल लागून त्याचा मृत्यू झाल्याने साऱ्या क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसला आहे.   

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.