ऑस्ट्रेलियाने उडवली भारताची दाणादाण, मालिकेत १-०ने आघाडी

ऑस्ट्रेलियाने भारताला पहिल्याच कसोटी सामन्यात पराभवाची धूळ चारलीये. जबरदस्त खेळाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ३३३ धावांनी दमदार विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी मिळवलीये.

Updated: Feb 25, 2017, 02:58 PM IST
ऑस्ट्रेलियाने उडवली भारताची दाणादाण, मालिकेत १-०ने आघाडी title=

पुणे : ऑस्ट्रेलियाने भारताला पहिल्याच कसोटी सामन्यात पराभवाची धूळ चारलीये. जबरदस्त खेळाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ३३३ धावांनी दमदार विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी मिळवलीये.

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज स्टीव्ह ओकेफीच्या जाळ्यात पुन्हा एकदा भारतीय संघ अडकला आणि अखेरपर्यंत काही बाहेर पडू शकला नाही. स्टीव्ह ओकेफीने तब्बल सहा बळी मिळवत भारताच्या दुसऱ्या डावालाही खिंडार पाडलेय.

भारताचा दुसरा डाव १०७ धावांवर संपुष्टात आला आणि तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने पहिला सामना खिशात घातला. सलग १९ कसोटी सामन्यांमध्ये अपराजित राहणाऱ्या भारतीय संघाचे मात्र ऑस्ट्रेलियासमोर काही चालले नाही. 

भारताच्या एकाही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. मालिका सुरु होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने कोहली हे आमचे पहिले लक्ष्य असेल असे म्हटले होते. या सामन्यात त्यांनी खरे करुन दाखवले. दोन्ही डावांत कोहलीला चांगली धावसंख्या उभारता आली नाही.