दुखापतीमुळे अश्विन पुढील दोन सामन्यांतून बाहेर

Updated: Apr 29, 2015, 08:07 PM IST
दुखापतीमुळे अश्विन पुढील दोन सामन्यांतून बाहेर title=
चेन्नई : कोलकाता नाईटरायडर्स विरूद्धच्या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करतांना रविचंद्रन अश्विनच्या बोटाला दुखापत झाली होती. ही दुखापत त्याच्या उजव्या हाताच्या बोटाला लागल्याने तो पुढील दोन सामन्यात खेळू शकणार नाही. 
 
चेन्नई टीमचे मॅनेजर रसेल राधाकृष्णन यांनी काल रात्री पत्रकार परिषदेत सांगितले की, 'अश्विनच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला दुखापत झाली आहे. आम्ही सांगू शकत नाही की दुखापत किती गंभीर आहे. त्यामुळे अश्विनला पुढील दोन सामन्यात न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.'
 
चेन्नईचा पुढील सामना कोलकात नाईट रायडरविरूद्ध कोलकाता येथे आहे. मात्र अश्विन चेन्नईतच राहणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.