केकेआरला मोठा झटका, नारायणच्या ऑफ स्पिनवर बंदी

कोलकाता नाईड रायडरचा ऑफ स्पिनर सुनिल नारायण आयपीएल-८मध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. बीबीसीआयने संशयास्पद अॅक्शनच्या तक्रारीच्या प्रकरणात नारायणच्या ऑफ स्पिनवर बंदी घातली आहे. 

Updated: Apr 29, 2015, 04:23 PM IST
केकेआरला मोठा झटका, नारायणच्या ऑफ स्पिनवर बंदी title=

नवी दिल्ली: कोलकाता नाईड रायडरचा ऑफ स्पिनर सुनिल नारायण आयपीएल-८मध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. बीबीसीआयने संशयास्पद अॅक्शनच्या तक्रारीच्या प्रकरणात नारायणच्या ऑफ स्पिनवर बंदी घातली आहे. 

सुनिल नारायणच्या विरुद्ध २२ एप्रिलला सनरायजर्स हैदराबादविरूद्ध झालेल्या सामन्यानंतर, त्याच्या संशयास्पद गोलंदाजीविरूद्ध तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर मॅच अधिकाऱ्यांनी चेन्नईच्या ऑर्थोस्कोपी अॅंड स्पोर्ट्स सायन्स सेंटरमध्ये त्याच्या अॅक्शनची तपासणी केली. तेथे त्याची अॅक्शन अवैध आढळून आली. बीबीसीआयने स्पष्ट केलं आहे की, जर पुढील सामन्यात नारायणने ऑफ स्पिन गोलंदाजी केली तर तो नो बॉल घोषीत करण्यात येईल.

बीबीसीआयने असंही स्पष्ट केलं आहे की, अवैध गोलंदाजी अॅक्शनच्या नियमानुसार नारायणची गोलंदाजी अवैध आढळली आहे. म्हणून नारायण बीबीसीआयद्वारा आयोजीत सामन्यांत ऑफ स्पिन गोलंदाजी करू शकत नाही आणि आयपीएलचं आयोजनही बीसीसीआयद्वारे केलं जातं. त्यामुळे आयपीएलमध्येही यापुढे नारायणला ऑफ स्पिन करता येणार नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.