हरभजनचा-अश्विनचा त्या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न

भारताचा ऑफस्पिनर आर.अश्विन आणि हरभजन सिंग यांच्यामध्ये भारतीय पीचवरून झालेल्या वादावर अखेर दोघांनीही आमच्यात मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Updated: Oct 17, 2016, 10:38 PM IST
हरभजनचा-अश्विनचा त्या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न  title=

मुंबई : भारताचा ऑफस्पिनर आर.अश्विन आणि हरभजन सिंग यांच्यामध्ये भारतीय पीचवरून झालेल्या वादावर अखेर दोघांनीही आमच्यात मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

मागच्या चार वर्षांपासून ज्या भारतातल्या ज्या पीचवर टेस्ट क्रिकेट खेळलं जात आहे, तसं पीच मला आणि कुंबळेला मिळालं असतं तर आम्हाला मिळालेल्या विकेटची संख्या जास्त असती, असं ट्विट हरभजननं केलं होतं. हरभजननं या ट्विटवरून अश्विनवर निशाणा साधल्याची चर्चा सुरु होती.

या वादावर हरभजन सिंगनं स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, मी अश्विनविषयी बोललो नसल्याचं हरभजन म्हणाला. तर मला हरभजनविषयी आदर आहे. हरभजननंच मला क्रिकेट खेळायला प्रेरणा दिली. 2001च्या हरभजनच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कामगिरीमुळेच मी ऑफ स्पिनर व्हायचं ठरवल्याचं अश्विन म्हणाला आहे. खेळाडूंना एकमेकांविरोधात दाखवून फक्त मसालेदार हेडलाईन मिळेल. लोकांचा सन्मान करायला शिका, असंही अश्विन त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला आहे.