एबी डेव्हिलियर्सचा टेस्ट कर्णधारपदाचा राजीनामा

दक्षिण आफ्रिकेचा बॅट्समन एबी डेव्हिलियर्सनं टेस्ट कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

Updated: Dec 12, 2016, 11:51 PM IST
एबी डेव्हिलियर्सचा टेस्ट कर्णधारपदाचा राजीनामा  title=

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचा बॅट्समन एबी डेव्हिलियर्सनं टेस्ट कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. एबीनं राजीनामा दिल्यानंतर फॅप डुप्लेसीसची आफ्रिकेच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वनडेमध्ये मात्र एबी डेव्हिलियर्सच आफ्रिकेचा कर्णधार असणार आहे.

इंग्लडच्या अयशस्वी दौऱ्यानंतर हशीम अमलानं आफ्रिकेचं कर्णधारपद सोडलं. यानंतर एबीची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. इंग्लडविरुद्धच्याच शेवटच्या दोन टेस्टमध्ये एबीनं कर्णधारपदाची जबाबदारी स्विकारली. पण लगेचच न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजआधी एबीच्या कोपराला दुखापत झाली. मागच्याच महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धची टेस्ट सीरिजही एबीला दुखापतीमुळे खेळता आली नव्हती.

फॅप डुप्लेसीसच्या नेतृत्वाखाली आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाला 2-1नं हरवलं होतं. अजूनही कोपराच्या दुखापतीतून एबी सावरलेला नाही, त्यामुळे श्रीलंकेविरुद्धची टेस्ट सीरिजही तो खेळणार नाही. संघाचं हित आणि ऑस्ट्रेलियातली यशस्वी कामगिरी लक्षात घेता फॅफ डुप्लेसीसकडे कर्णधारपदाची सूत्र सोपवावीत, अशी प्रतिक्रिया एबीनं दिली आहे.