नवी दिल्ली : आयपीएस सुरू होऊन ८ वर्ष झाली. तेव्हापासून महेंद्र सिंग धोनी, सुरेश रैना, रविंद्र जडेजा आणि आर. अश्विन या चेन्नई सुपरकिंगसाठी खेळणाऱ्या चारही खेळाडूंमध्ये चांगलीच मैत्री जमली होती. पण आता हे एकत्र खेळणार का नाही याचा निकाल उद्या लागणार आहे.
चेन्नई सुपरकिंग आणि राजस्थान रॉयल्स ही टीम बाद ठरल्याने या दोन्ही टीमच्या खेळाडूंचा पुन्हा लिलाव होणार आहे. त्यामुळे धोनी हा कोणत्या संघातून खेळणार या बरोबरच हे चारही खेळाडू पुन्हा एकत्र खेळतील का याबाबतचं चित्र उद्या स्पष्ठ होईल.
महेंद्र सिंग धोनीला पुणे टीम आपला अधिकार वापरून खरेदी करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे अनेक आयपीएल एकाच टीममधून खेळणारे हे 4 खेळाडू यानंतर एकमेकांच्या विरोधात खेळतांना दिसतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.