२०१६चा टी-२० वर्ल्डकप भारत जिंकेल, शेन वॉर्नला विश्वास

पुढील वर्षी होणारा टी-२० वर्ल्डकप भारत जिंकेल असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्नने व्यक्त केलाय. २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्यावहिल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताने बाजी मारली होती

Updated: Mar 7, 2016, 04:50 PM IST
 २०१६चा टी-२० वर्ल्डकप भारत जिंकेल, शेन वॉर्नला विश्वास title=

मेलबर्न : पुढील वर्षी होणारा टी-२० वर्ल्डकप भारत जिंकेल असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्नने व्यक्त केलाय. २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्यावहिल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताने बाजी मारली होती

वॉर्नच्या मते टी-२० वर्ल्डकप विजेतेपदासाठी भारत प्रबळ दावेदार आहे. ट्विटरवरुन त्याने आपले मत व्यक्त केले. तसेच मुंबईतील वानखेडे मैदान हे आवडते मैदान असल्याचेही वॉर्न यावेळी म्हणाला. 

आयसीसी वर्ल्ड टी-२० स्पर्धेला पुढील वर्षी १५ मार्चपासून सुरुवात होतेय. भारत या स्पर्धेचे यजमानपद भूषवतोय. शुक्रवारी झालेल्या आयसीसीच्या पत्रकार परिषदेत याची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेची फायनल कोलकाताच्या ईडन गार्डनवर होणार आहे तर मुंबई आणि नवी दिल्लीत सेमीफायनल होईल. बंगळूरु, धर्मशाला, मोहाली आणि नागपूरमध्येही सामने होतील. 

स्पर्धेच्या दोन राऊंडमध्ये १६ संघ सहभागी होती. पहिल्या राऊंडचे सामने बांगलादेश, झिम्बाब्वे, स्कॉटलँड, आर्यलंड, हाँगकाँ, नेदरलँडस आणि ओमान यांच्यात होतील.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.