मुंबई : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. मॅचमधला रोमांच आता वाढायला सुरुवात झाली आहे. जगातील प्रत्येक क्रिकेट प्रेमींचं लक्ष हे उद्याच्या मॅचवर असणार आहे.
उद्याच्या मॅचमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावणार आहेत.
सामन्यामधील ३ महत्त्वाच्या गोष्टी :
१. टॉस : मॅचवर टॉसची भूमिका मोठी असणार आहे. कारण दोन्ही संघ टॉस जिंकूण प्रथम बॅटींग करणं पसंद करतील. बॉलिंग ही पाकिस्तानची मजबूत बाजू आहे. रनचा पाठलाग करतांना पाकिस्तानला नेहमी पराभवाचा सामना करावा लागलाय.
२. खेळपट्टी : कोलकात्याची पिच ही वेगळी आहे. या पिचवर बॉलर्सला चांगली मदत मिळेल पण बॅट्समनला ही या पिचवर चांगले शॉट्स खेळता येणार आहेत. त्यामुळे पिचचं देखील महत्त्व तेवढंच आहे.
३. दव : जी टीम नंतर बॅटींग करेल त्या टीमला दवबिंदूचा सामना करावा लागेल. स्पिनर्सला याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. त्यामुळे किती दव पडतो यावर देखील कर्णधार निर्णय घेतील.