कपिल आणि `गुत्थी` पुन्हा एकाच स्टेजवर...

‘कॉमेडी नाईटस् विथ कपिल’ या कार्यक्रमातून लोकांच्या हृद्यात स्थान मिळवणाऱ्या हास्य कलाकार कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांनी परदेशातही आपला ठसा उमटवलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 23, 2013, 03:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘कॉमेडी नाईटस् विथ कपिल’ या कार्यक्रमातून लोकांच्या हृद्यात स्थान मिळवणाऱ्या हास्य कलाकार कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांनी परदेशातही आपला ठसा उमटवलाय. कपिल आणि सुनीलनं या आठवड्याच्या सुरुवातीला मस्कटमध्ये दमदार कार्यक्रम केला आणि लोकांची वाहवाही मिळवली. त्यामुळे या दोघांनी आपल्या मनात एकमेकांबद्दल असलेला कडवटपणा विसरल्याचं अनेकांना वाटतंय.
सोशल नेटवर्किंग वेबसाईटवर कपिल शर्मानं आपल्या शोबद्दल आपल्या चाहत्यांना कळवताना लिहिलं होतं... ‘मस्कटमध्ये लाईव्ह शो... आत्तापासून ठिक ४५ मिनिटांनंतर... वी विल रॉक द स्टेज’.
या कार्यक्रमाशी संबंधित कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांचा एक मोठा फोटोदेखील ट्विटरवरून शेअर करण्यात आला होता. या फोटोत दोघंही कलाकार एकमेकांकडे इशारा करत आपापल्या फोटोसमोर उभे होते.
सुनील ग्रोवर ऊर्फ ‘गुत्थी’नंही कपिलसोबत होणाऱ्या आपल्या कार्यक्रमाबद्दल ट्विट केलं होतं. कपिल आणि ‘गुत्थी’चे करोडो चाहते आहेत आणि या दोन्ही चाहत्यांना एकत्र पाहणं त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाचीच गोष्ट असेल.
कपिलच्या अनेक चाहत्यांनीदेखील कपिलला पत्र लिहून सुनील ग्रोवर (गुत्थी)ला आपल्या ‘कॉमेडी नाईटस् विथ कपिल’ या कार्यक्रमात परत आणावं, असा हट्ट धरलाय.
नुकतंच, सुनीलनं ‘कॉमेडी नाईटस् विथ कपिल’ या कार्यक्रमाला अलविदा केलाय. हा कार्यक्रम सोडण्यासाठी त्यानं कोणतंही
कारण दिलेलं नाही. जास्त मानधन मिळण्यासाठी सुनीलनं या कार्यक्रमाला टाटा केलाय, असंही म्हटलं जात होतं. परंतु, सुनीलनं या अफवा असल्याचं म्हटलं होतं.
काहीही असो, कपिल आणि सुनीलला एकाच स्टेजवर पाहताना त्यांच्या चाहत्यांना मात्र प्रचंड आनंद झाला असेल, हे वेगळं सांगायला नकोच. (फोटो सौजन्य : -@KapilSharmaK9)

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.