www.24taas.com,पन्हाळा
महाराष्ट्राचं ऐतिहासिक वैभव नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्राच्या शौर्याचं प्रतीक असलेले गडकिल्ले ढासळू लागलेत. आणि सरकारचे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं दिसतंय.
ऐतिहासिक ठेवा जपण्याऐवजी त्याबाबत किती उदासीन दृष्टीकोन ठेवला जातोय हे झी 24 तास आपल्या समोर आणतंय. सिंहगडचा कल्याण दरवाजा, प्रतापगडावर सूर्य बुरूजासह ढासळणारे बुरूज, सिंधुदुर्ग किल्ल्याची होणारी पडझड आणि कोल्हापुरात तर शाहुंनी बांधलेला प्रिन्स शिवाजी हॉलच पाडून टाकण्याची घटना आहेत.
आता तर पन्हाळ्याची पडझड. हे सगळं धक्कादायक चित्र आहे महाराष्ट्रातलं. महाराष्ट्राचं ऐतिहासिक वैभव असंच नष्ट होणार का असा सवाल आता दुर्गप्रेमी करतायत. सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष संतापजनक आहे.
महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा असा एक एक करून ढासळत असताना आता पन्हाळ्यातील ऐतीहासीक तीन दरवाजाच्या शेजारील बुरुज ढासळलाय. पुरातत्व विभागाच्या ठिसाळ कामाचा फटका या बुरुजाला बसलाय. तीन वर्षांपूर्वी पुरातत्व विभागाच्यावतीनं या बुरुजाचं बांधकाम करण्यात आलं होतं.पण तिन वर्षे पूर्ण होण्याअधिच हा बुरुज ढासळल्यानं शिवप्रेमीतून संताप व्यक्त होतोय.