आळंदी नगरी पालखी सोहळ्यासाठी सज्ज

मोक्षाप्राप्तीचं प्रवेशद्वार असलेली नगरी म्हणजे आळंदी.. आळंदी नगरी पालखी सोहळ्यासाठी सज्ज झालीय... संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज प्रस्थान ठेवेतेय... त्यासाठीची तयारीही पूर्ण झालीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 20, 2014, 08:35 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, आळंदी
मोक्षाप्राप्तीचं प्रवेशद्वार असलेली नगरी म्हणजे आळंदी.आळंदी नगरी पालखी सोहळ्यासाठी सज्ज झालीय... संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज प्रस्थान ठेवेतेय.त्यासाठीची तयारीही पूर्ण झालीय.
संथ वाहणारी इंद्रायणी. इंद्रायणी काठावरचं हे संत ज्ञानेश्वर महाराजांचं संजीवन समाधी मंदिर. चैतन्याची अनुभूती मिळवण्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून येणारे हे भाविक. आता या भाविकांना आस लागलीय ती पंढरीच्या विठू रायच्या दर्शनाची. त्याच आशेन अनेक भाविक सध्या आळंदीत दाखल झालेत... विठ्ठल नामाचा मुखी जयघोष आणि ज्ञानेश्वर महाराजांचा जप करत असंख्य भाविक इंद्रायणी काठी दाखल झालेत...अवघ संजीवन समाधी मंदिर भाविकांच्या मुखातून येणा-या हरीनामाच्या जयघोषान भरून गेलंय.
या वारी सोहळ्यात भक्तांना सर्व दु:ख, अडचणींचा विसर पडतो. म्हणूनच ही वारी करण्यासाठी अनेकजन वर्षानुवर्ष येतात. प्रत्येक वर्षी त्यांना अलौकिक अनुभूती मिळते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान ठेवेतेय खर पण आता तेवढीही वाट पहान भक्तांना शक्य नाही... प्रत्येक जन या धार्मिक सोहळ्याच्या अनुभूतीन तृप्त होण्याची इच्छा व्यक्त करतोय.
वारी सोहळ्याचा अविभाज्य घटक म्हणजे वासुदेव…. यंदाही वारी सोहळ्याला वासुदेव दाखल झालेत. त्यांच्या परंपरागत गीतांनी परिसर भाराहून गेलाय… विठ्ठलाचा आठवा अवतार म्हणजे वासुदेव… त्याच मूळ वारीत सहभागी होण्याची वासुदेवाची ही परंपरा पिढ्यानपिढ्या सुरु आहे. वारीत वासुदेवही सहभागी झालेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.