पुणे... राज्यातील सर्वांत मोठी महापालिका होणार?

पुणे महापालिका लवकरच राज्यातील सर्वात मोठी महापालिका होणार आहे. शहराला लागून असेलली ३४ गावं महापालिकेत समाविष्ट करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी सही केल्याची चर्चा आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 28, 2014, 09:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुणे महापालिका लवकरच राज्यातील सर्वात मोठी महापालिका होणार आहे.
शहराला लागून असेलली ३४ गावं महापालिकेत समाविष्ट करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी सही केल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुणे ही सर्वाधिक लोकसंख्या तसेच सर्वाधिक विस्तार असणारी महापालिका ठरणार आहे. लवकरच त्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. या विस्तारीकरणामुळे पुण्याची लोकसंख्या 50 लाखांपर्यंत वाढणार आहे. सध्या शहराची 35 लाख लोकसंख्या आहे.

... या गावांचा पुणे महानगरपालिकेत होणार समावेश
बावधन, सूस, म्हाळुंगे, उत्तमनगर, नांदेड, कोपरे, कोंढवे-धावडे, किरकटवाडी, लोहगाव, पिसोळी, साडेसतरा नळी, मुंढवा, मांजरी बुद्रुक, नर्हे, शिवणे, आंबेगाव, उन्ड्री, उर्वरित धायरी, उरुळी देवाची, मंतरवाडी, होळकरवाडी, औताडे, फुरसुंगी, नांदोशी, मांगडेवाडी

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.