www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पालखीचं स्वागत करण्यासाठी यंदा स्वागत कमानी लावू नयेत असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. त्याच बरोबर पालखी रथावर बसण्याचं मान्यवर लोकांनी टाळावं असाही निर्णय घेण्यात आलाय.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पालखी प्रमुख पुणे, सातारा, सोलापूर जिल्हाधिकारी, आमदार आणि पुणे पिंपरी चिंचवड चे आयुक्त उप्स्तिथ होते. त्यात हे निर्णय घेण्यात आलेत. पालखी ज्या दिवशी पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात येणार आहे, त्यादिवशी शाळा दोन तास आधी सोडण्याचा निर्णयही घेण्यात आलाय. पालखी सोहळ्या दरम्यान नीरा उजवा, डावा कालवा आणि खडकवासला कालव्यातून पाणी सोडणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिलीय.
आषाढी वारी दिवशी पंढरपूर मध्ये मोबाईल ज्याम होतात, ते घडू नये या साठी मोबाईल कंपन्यांना बुस्टर बसवण्याचे आदेश ही देण्यात आलेत. इतरही अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.