www.24taas.com, कोल्हापूर
साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असणा-या महालक्ष्मी मंदिरात लाडुच्या प्रसादाचा ठेका महिला बचत गटांना देण्यासाठी 6 जुन 2012 ला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समीतीच्यावतीनं जाहीर कोटेशन काढण्यात आलं. त्यानंतर 8 ऑगस्टला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उदय पवार यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवुन महिला मासीक पाळीच्यावेळी जर कामावर आल्या तर प्रसादाचं पावित्र नष्ठ होवु शकतं, त्यामुळं महिला बचत गटांना लाडु प्रसादाचं टेंडर देवू नये अशी मागणी केली.
जिल्हाध्यक्ष उदय पवार यांच्या या भुमीकेमुळं महिला वर्गातुन आणि विवीध सामाजिक संघटनातून संताप व्यक्त होतोय. मनसेचे आमदार राम कदम यांनी महालक्ष्मी मंदिरातील गाभा-यात महिलांना प्रवेश मिळावा म्हणुन 14 एप्रील 2011 ला महिलांना घेवुन आंदोलन केलं होतं. पण आता मनसे जिल्हाध्यक्ष उदय पवार यांच्या या भुमिकेमुळं मनसेची नेमकी भुमिका कोणती याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मनसेच्या जिल्हाध्यक्षांच्या या पत्राच्या विरोधात कोल्हापूरातील प्रजासत्ताक समाजीक संघटनेनं न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिलाय.
महालक्ष्मी देवीचा प्रसाद, लाडु की पेढा-फुटाना यावरुन आधिच पश्चीम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये वाद आहे. या वादातून मार्ग म्हणुन देवस्थान समितीनं महिला बचत गटांसाठी काढलेलं टेंडरचं रद्द करुन टाकलं.त्यात मनसेच्या जिल्हाध्यक्षाचं हे पत्र उघडकीस आल्यामुळं या वादात आणखी भर पडली.