मावळ घटनेला २ वर्षं पूर्ण!

मावळ गोळीबाराची घटना 9 ऑगस्ट 2011 ला घडली. त्याला उद्या 2 वर्ष पूर्ण होत आहेत. हे आंदोलन घडण्यापूर्वी बऱ्याच घडामोडी घडल्या.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 8, 2013, 07:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मावळ
मावळ गोळीबाराची घटना 9 ऑगस्ट 2011 ला घडली. त्याला उद्या 2 वर्ष पूर्ण होत आहेत. हे आंदोलन घडण्यापूर्वी बऱ्याच घडामोडी घडल्या. मावळ शेतक-यांवर झालेल्या अन्यायामुळे आधीच संतापलेल्या शेतक-यांना आक्रमक आंदोलन करावं लागलं आणि गोळीबाराच्यी घटना घडली.
पिंपरी चिंचवड शहराला बंद पाईपलाईनमधून पाणीपुरवठा करावा लागणार होता. त्याला विरोध म्हणून शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांच्यावर गोळीबार झाला.. मात्र हे एवढ्यावर थांबत नाही. आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना शेतक-यांची झाली होती. पावना धरण, एक्सप्रेस हायवे या प्रकल्यांपासून जमिनी गेल्या पण त्याचा योग्य मोबदला मिळत नाही अशी शेतक-यांची भावना होती. त्यातच बंद पाईपलाईनचा प्रकल्प.. त्यामुळे पुन्हा जमिन जाणार, पाण्याचाही प्रश्न उदभवणार त्यामुळे शेतकरी संतापला होता. 2008 मध्ये प्रकल्पाची घोषणा झाल्यावर शेतकरी भेदरला. 2010 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आणि आंदोलनाला सुरूवात झाली. भाजपचे स्थानिक आमदार बाला भेगडे यांनी नेतृत्व करत आंदोलन तीव्र केलं. 9 ऑगस्टला शेतक-यांनी एक्सप्रेसवे वर आंदोलनाला सुरूवात केली. त्याचवेळी बाला भेगडे यांनी विधानसभेत या मुद्द्यावर आंदोलन केलं. अचानक बाराच्या सुमाराल शेतक-यांच्यां आंदोलनावर गोळीबार झाला त्यात मोरेश्वर साठे, कांताबाई ठकार आणि शांताराम तुपे यांना प्राण गमवावा लागला.
वास्तविक बंद पाईपलाईनमधून पाणी पुरवठ्याची योजना पिंपरी चिंचवडसाठी उपयोगाची होती. मात्र ती अंमलात आणताना शेतक-यांना विश्वासात घेतलं गेलं नाही त्यामुळे भडका उडाला आणि त्यातून तीन शेतकरी कुटुंब उद्ध्वस्त झाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.