पुणे, नवी दिल्ली : जून बरोबरोबरच जुलै महिना देखील पावसासाठी फारसा समाधानकारक नसल्याचा अंदाज कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केलाय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला डॉ. साबळे यांनी दिलाय. त्याचप्रमाणे पावसाचा कमी झालेला कालावधी लक्षात घेऊन पीक पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज डॉ. साबळे यांनी व्यक्त केलीय.
आपल्या राज्यातली इतर शहरं कसं पाणी संकट सोसत आहेत. दुष्काळाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार सज्ज असून मान्सूनची स्थिती सुधारेल, असा आशावाद केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी व्यक्त केलाय. रेंगाळलेला मान्सून आणि महागाईवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बैठक पार पडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत मान्सूनच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. हवामान खात्याने 7 जुलैनंतर चांगल्या मान्सूनची भविष्यवाणी केलीय. या बैठकीला कृषीमंत्र्यांसह, अर्थमंत्री अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंह आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान उपस्थित होते.
राज्यातल्या जवळपास सर्वच शहरात प्रचंड पाणीकपात सुरू आहे. मनमाडसारख्या शहरात तब्बल 25 दिवसांतून एकदा पाणी येतंय. मुंबई पुणेकरांनो पाणी सांभाळून वापरा, अशी सांगण्याची वेळ आली आहे. पावसाच्या विलंबाचा पहिला फटका पुणेकरांना बसलाय. पुण्यावर अखेर पाणीकपातीचं संकट ओढवलंय.
पुण्याला पाणीपुरवठा करणा-या धरणांमधील पाणीसाठी कमी झाल्यानं महापालिकेनं पाणीकपातीचा निर्णय़ घेतलाय. धरणांमधील साधा समाधानकारकरीत्या वाढेपर्यंत पाणीकपात लागू राहणार असल्याचं पुणे महापालिकेतर्फे सांगण्यात आलंय. तसंच पाणी जपून वापरण्याचं आवाहनही पुणे महापालिकेनं केलंय. 28 जूनपासून पुण्यात पाणीकपात लागू होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.