कोल्हापूर : जातीय विषमतेविरुद्ध आणि उच्चनीचतेविरुद्ध बंड पुकारुन समता स्थापन करणारा ‘रयतेचा राजा’ म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज... अशा या थोर राजानं मागासलेल्या समाजाकरीता भारतात शंभर वर्षापुर्वी 50 टक्के आरक्षणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. आज शाहू महारांची 140 वी जयंती आहे
राजर्षी छत्रपती शाहू महाराज... सत्तेला सेवेचं आणि ध्येयाचं साधन बनवणारा जनतेचा राजा... या राजानं करवीर राज्यामधील मागासलेल्या लोकांसाठी 26 जूलै 1902 मध्ये 50 टक्के आरक्षणाचा जाहीरनामा पहिल्यांदा प्रसिद्ध केला होता. या जाहिरनाम्यानंतर मागासलेल्या लोकांसाठी सरकारी नोकरीत 50 टक्के आरक्षण देण्यात आलं होतं. कोणत्या समाजाला आरक्षणाची खरी गरज आहे, हे ओळखूनच त्यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, असं इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत सांगतात.
जनकल्याण हा उदात्त हेतू समोर ठेनच महाराजांनी राज्यकारभार चालवला. मागासलेल्या समाजाच्या उन्नतीसाठी एक प्रभावी उपाय सुचवणारा हा जाहीरनामा म्हणजे दलीतांच्या, बहुजन मराठ्यांच्या सामाजीक स्वातंत्र्याची सनद आहे असं इतिहास संशोधकांचं मत आहे..
शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी केलेल्या आरक्षणाच्या कायद्यामुळं सामाजिक परिवर्तनाची लाट निर्माण झाली. त्याचबरोबर समाजाच्या प्रवाहातून बाहेर फेकले गेलेल्यांना न्याय मिळाला. अशा या थोर राजाला 140 व्या जयंती निमित्त ‘झी मीडिया’चा मानाचा मुजरा...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.