अपहरण आणि हत्येच्या फरार आरोपीला अटक

पुण्यातल्या रुपाली चव्हाण अपहरण आणि हत्या प्रकरणातला आरोपी हनुमंत ननवरे तब्बल चार वर्षांनी पोलिसांच्या तावडीत सापडलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 17, 2013, 09:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यातल्या रुपाली चव्हाण अपहरण आणि हत्या प्रकरणातला आरोपी हनुमंत ननवरे तब्बल चार वर्षांनी पोलिसांच्या तावडीत सापडलाय.
ऑगस्ट २००७ मध्ये पुण्यात आयटी क्षेत्रात काम करणा-या रुपाली चव्हाण यांची हनुमान ननवरे यानं वानवडीमधून अपहरण करून वरंध घाटात हत्या केली होती. त्यावेळी रुपाली चव्हाण गरोदर होत्या. रुपालीच्या हत्येनंतर ननवरे याला अटक झाली होती. मात्र हा खटला कोर्टात चालू असताना, २०१० मध्ये ननवरे ससून हॉस्पिटलमध्ये उपचाराच्या वेळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळला होता.
दाभोलकरांच्या हत्येचा तपास करत असताना ननावरे केरळमध्ये एका कंपनीत काम करत असल्याचं पोलिसांना समजलं. तो सासवडला त्याच्या घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.