मनसेचा पुण्यात विरोधकाचा दावा

पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदावर मनसेनं दावा सांगितला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप-आरपीआय गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुतीला मनसे दे धक्का देणार का, याची उत्सुकता आहे.

Updated: Feb 23, 2012, 11:05 AM IST

www.24taas.com, पुणे

पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदावर मनसेनं दावा सांगितला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप-आरपीआय गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुतीला मनसे दे धक्का देणार का, याची उत्सुकता आहे.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ५१ जागा जिंकत राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. तर २९ जागा जिंकत मनसे दुस-या क्रमांकाचा पक्ष ठरलाय. महायुतीच्या एकूण जागांची संख्या मनसेपेक्षा जास्त असली तरी शिवसेना, भाजप आणि रिपाई या पक्षांनी वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवली होती. त्यामुळे नियमांनुसार विरोधी पक्षनेतेपद मनसेला मिळायला हवं, असा दावा मनसेनं केला आहे.

पुण्यात निवडणूक प्रचाराच्यावेळी मनसेने एक हाती सत्तेची मागणी केली होती. परंतु पुणेकरांनी मनसेच्या झोळीत मतं टाकताना दुसरा क्रमांक दिला. मनसेचा दावा जर मानला गेला तर विरोधी पक्षनेते पद जाणार आहे. मात्र, शिवसेना आपल्याकडे हे पद राखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार, यात शंका नाही. त्यामुळे आता विरोधी पक्षनेते पदासाठी आता रस्सीखेच दिसून य़ेणार आहे.