मेलबर्न : ऑस्ट्रेलियामध्ये सध्या ट्राय सिरिज सुरु आहे. या तिरंगी मालिकेत भारताने पराभवाने सुरुवात केली तरी क्रिकेटच्या मैदानात अनेक आश्चर्यकारक घटना घडत आहेत. अनेकवेळा गंमतीजमती होतात, तर काही वेळा वाईट प्रसंगांनाही सामोरे जावे लागले आहे. मात्र, मैदानावर एक विचित्र घटना घडली. एका चेंडूमुळे तिघांना जखमी व्हावे लागलेय.
ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरियन प्रिमीयर लीगमध्ये डोंकास्टर क्रिकेट क्लब आणि फुटस्कॅरी क्लबमध्ये एक सामना खेळवण्यात आला. यावेळी एकाच सामन्यात एकाच चेंडूमुळे तीन खेळाडू जखमी झाले.
हे तीनही खेळाडू म्हणजे फलंदाज, गोलंदाज आणि नॉन स्ट्राईकरचा फलंदाज. फलंदाजने एक जोराचा फटका मारला. मात्र तो फटका समोरील नॉन स्ट्राईकर फलंदाज्याच्या पायावर आदळला. त्यावेळीच नॉन स्ट्राईकरच्या पायाला लागलेला चेंडू, गोलंदाजच्या मागे गेला. क्षेत्ररक्षकांने अडवून गोलंदाजकडे फेकला, मात्र तो त्याचं लक्ष नसल्यामुळे तो डोक्यावर आदळला. त्यामुळे जखमी झालेला गोलंदाज जमिनीवर बसला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.