सुशीलकुमारपेक्षा पद्म पुरस्कारावर माझा हक्क जास्त - सायना

ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता सायना नेहवाल हिचा पद्म भूषण पुरस्कारासाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आलाय... त्यामुळे, सायनाचा हिरमोड झालाय. खेळ मंत्रालयाच्या नियमांचं कारण देत या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी सायनाचा अर्ज फेटाळण्यात आलाय.

Updated: Jan 3, 2015, 06:58 PM IST
सुशीलकुमारपेक्षा पद्म पुरस्कारावर माझा हक्क जास्त - सायना title=

नवी दिल्ली : ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता सायना नेहवाल हिचा पद्म भूषण पुरस्कारासाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आलाय... त्यामुळे, सायनाचा हिरमोड झालाय. खेळ मंत्रालयाच्या नियमांचं कारण देत या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी सायनाचा अर्ज फेटाळण्यात आलाय.

भारतीय बॅडमिंटन संघानं गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात खेळ मंत्रालयाकडे सायनाच्या नावाची शिफारस केली होती. पण, मंत्रालयानं दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटून सुशीलकुमार याची या पुरस्कारासाठी निवड केली. सुशीलकुमार या पुरस्कारासाठी अधिक पात्र उमेदवार खेळाडू आहे, असं मंत्रालयाचं म्हणणं आहे. 

वर्ष 2010 मध्ये पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या सायनाच्या म्हणण्यानुसार, 'मला जेव्हा समजलं की विशेष पद्धतीनं सुशील कुमारचं नाव पुरस्कारासाठी पाठवण्यात आलंय पण, क्रीडा मंत्रालयानं गृहमंत्रालयाला माझं नाव मात्र पाठवलं नाही... मंत्रालयाच्या निर्देशानुसार, दोन पद्म पुरस्कारांमध्ये पाच वर्षांचं अंतर असणं गरजेचं आहे. यामुळे, जर त्यांनी सुशीलकुमारचं नाव पुढे केलं तर मग माझं नाव का पुढे पाठवण्यात आलं नाही... मी पाच वर्षांची वेळ पूर्ण केलीय. मला याचं खूप वाईट वाटतंय'

गेल्या वर्षी याच नियमांच्या आधारे आपल्या नावाचा अर्ज फेटाळण्यात आला होता मात्र या वर्षी मंत्रालयानं सुशीलकुमारच्या नावाची शिफारस करण्याचा निर्णय घेतला... महत्त्वाचं म्हणजे, सुशीलकुमारनं हा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केलेला नाही, असा दावा सायनानं केलाय. सुशीलकुमारला 2011 साली पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं होतं. 
 
'2010 नंतर मी राष्ट्रकुल खेळांत सुवर्णपदक, बॅडमिंटनमध्ये पहिलं ऑलिम्पिक पदक, करिअरच्या सर्वश्रेष्ठ दुसरी रँकींग आणि अशी अनेक सुपर सीरिज पुरस्कार जिंकलेत... त्यामुळे, माझादेखील या पुरस्कारावर हक्क होता. पण, अशामध्ये तुमचं नाव पाठिमागे पडल्यानंतर वाईट वाटतं' असं सायनानं स्पष्टपणे म्हणत क्रीडा मंत्रालयानं केलेल्या भेदभावावर टीका केलीय. 

आपण, यासंबंधी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी बोलणं केलं... तेव्हा त्यांनी सुशीलकुमारचं नाव पाठवण्यात आल्याचं सांगितलंय... माझं केवळ इतकंच म्हणणं आहे की जर आम्हाला दोघांनाही पुरस्कार मिळाला तर चांगलंच आहे... जर त्याचं नाव विशेषरुपात पुढे सरकवण्यात येऊ शकतं तर माझं का नाही?... आणि जर ते नियमांनुसार चालत असते तर यंदा माझं नाव पुढे पाठवायला हवं होतं, असं सायनानं म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.