कोथिंबीर... ३४० रुपये एक जुडी!

नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीरला विक्रमी भाव मिळालाय. आजपर्यंतच्या बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच कोथिंबीरच्या एका जुडीला ३४० रुपये मोजावे लागलेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 26, 2013, 01:28 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीरला विक्रमी भाव मिळालाय. आजपर्यंतच्या बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच कोथिंबीरच्या एका जुडीला ३४० रुपये मोजावे लागलेत.
गेल्या दोन दिवसापासून नाशिक परिसरात आणि पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस सुरु असल्याने बाजार समितीतल आवक घटल्यान पालेभाज्यांचे भाव गगनाला भिडलेत. कोथिंबीर बरोबरच मेथीलाही जादा पैसे मोजावे लागतायत. मेथी ५० रुपये, शेपू ३५ रुपये कांद्याची पात ४५ रुपयाला एक या दराने विकली जातेय. यासह भरताची वांगी ४० रुपये किलो दराने विकली जातेय. कारले ६० ते ७० रुपये, ढोबळी मिरची ५० रुपये, वांगी ४० रुपये, भोपळा ३० रुपये, कांदा ४० ते ४५ रुपये किलो या दराने विकला जातोय.

आधीच दुष्काळाने पाण्या अभावी उत्पनावर परिणाम झालेल्या शेतकऱ्याला गेल्या दोन दिवसापासून येणाऱ्या पावसामुळे भाजीपाल ओला झाल्याने फटका बसलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.