शाळेने वाटल्या विद्यार्थिनींना गर्भवती महिलांच्या गोळ्या!

धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यात किशोवयीन मुलींना लोहयुक्त गोळ्यांऐवजी गरोदर मातांसाठी असलेल्या गोळ्यांच वाटप करण्यात आलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 28, 2013, 07:08 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, शिरपूर
धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यात किशोवयीन मुलींना लोहयुक्त गोळ्यांऐवजी गरोदर मातांसाठी असलेल्या गोळ्यांच वाटप करण्यात आलं. सुदैवानं या गोळ्यांमधले घटक समान असल्यानं अनर्थ टळला. मात्र यामुळे आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय.
धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर शहरातल्या कन्या विद्यालयात 50 मुलींना लोहयुक्त गोळ्या खाल्यानं उलट्या, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास झाला होता. या मुलीनं रिकाम्या पोटी गोळ्या घेतल्यानं हा त्रास झाल्याचा दावा आरोग्य प्रशासनानं केला. मात्र जिल्हा शल्यचिकित्सकांच्या चौकशीत धक्कादायक सत्य समोर आलंय. या मुलींना चक्क गर्भवतींसाठी असलेल्या गोळ्या देण्यात आला. विशेष म्हणजे या दोन्ही गोळ्यांचा रंग वेगळा असूनही अंधाधुदपणे गोळ्यांचं वाटप करण्यात आलं.

या प्रकारानंतर जिल्हा आरोग्य विभागानं सर्व समन्वयकांची बैठक तातडीनं बोलावली खरी. पण अद्यापही शिरपूरचे जबाबदार अधिकारी आपली चूक मान्य करायला तयार नाहीत.आरोग्य विभागही या अधिका-यांना वाचवण्याचा प्रयत्न करतोय.

या दोन्ही गोळ्यातले घटक समान असल्यानं सुदैवानं कोणताही अनर्थ झाला नाही. पण आजही चुकीच्या गोळ्या देणारे डॉक्टर शिरपूरच्या रुग्णालयात राजरोसपणे काम करतायत. या डॉक्टरांवर कधी कारवाई होणार हा प्रश्न उपस्थित झालाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.