किडनी रॅकेट : तीन डॉक्टरांची चौकशी, मुख्य सूत्रधार फरारी

येथील किडनी रॅकेटमध्ये पोलिसांनी आज औरंगाबादच्या तीन डॉक्टरांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. हे तिघेही औरंगाबादच्या बजाज हॉस्पिटलचे असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. 

Updated: Dec 5, 2015, 11:46 PM IST
किडनी रॅकेट : तीन डॉक्टरांची चौकशी, मुख्य सूत्रधार फरारी title=

अकोला : येथील किडनी रॅकेटमध्ये पोलिसांनी आज औरंगाबादच्या तीन डॉक्टरांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. हे तिघेही औरंगाबादच्या बजाज हॉस्पिटलचे असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. 

अकोल्यातील हरीहरपेठ भागातील शांताबाई खरात या महिलेनं आपली किडनी काढण्याचं ऑपरेशन बजाज हॉस्पिटलमध्ये झाल्याची माहिती दिली होती. त्यावरून अकोला पोलिसांनी ही कारवाई केली. 

दरम्यान, या प्रकरणी अटक केलेला तिसरा आरोपी हा बुलडाण्याचा विनोद पवार असल्याचं स्पष्ट झालंय. पवारनंच शांताबाई खरातच्या किडनी विक्री प्रकरणात दलाली केल्याचं  समोर आलं होतं. आतापर्यंत पडद्यामागे असलेला मुख्य तक्रारदार संतोष गावली याचीही अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं कसून चौकशी केली.

गावलीच्या तक्रारीनंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आलंय. तर या मुख्य आरोपी आणि सूत्रधार शिवाजी कोळी अद्याप फरार आहेय. तो सांगली जिल्ह्यातला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.