मुंबई : जळगावातील भाजपच्या एका बड्या नेत्यानं तस्करी केलेली किडनी बसवल्याचा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय...
सत्ताधारी शिवसेनेचेच जळगावचे आमदार गुलाबराव पाटील यांनी रावेरमध्ये केलेल्या एका भाषणाचा आधार मलिकांनी घेतलाय... त्याला महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
हिंमत असेल तर मलिकांनी त्या नेत्याचं नाव सांगावं, असं आव्हान खडसेंनी दिलंय... त्याच वेळी किडनी रॅकेटबाबत जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीच्या सूचना दिल्याचंही त्यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.